राष्ट्रपतीपदासाठीचे मतदान संपले

राष्ट्रपतीपदासाठीचे मतदान संपले

देशाच्या 14 व्या राष्ट्रपतिपदासाठी आज मतदान पार पडले.  सकाळी 10 वाजल्यापासून मतदान सुरू झाली  ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान करण्यात आले.   संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य, पंतप्रधानांसह मंत्री दिल्लीत संसदेत मतदान केले.  एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या उमेदवार मीराकुमार यांच्यात राष्ट्रपतीपदासाठी लढत आहे. मात्र पाठिंब्याचा विचार केला तर सध्या तरी कोविंद यांचे पारडे जड मानले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी मतदान केले. भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मतदान केले. राष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात थेट लढत आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि आमदार रमेश कदम हे दोघे सध्या तुरुंगात आहे. या दोघांना कोर्टाने मतदानाची परवानगी ‍दिली होती त्यामुळे मतदानासाठी दोघांना तासभरासाठी तुरुंगाबाहेर आणण्यात आले होते.

COMMENTS