राष्ट्रपतीपदी एनडीएचा उमेदवार निवडून येईल –  प्रफुल्ल पटेल

राष्ट्रपतीपदी एनडीएचा उमेदवार निवडून येईल – प्रफुल्ल पटेल

एनडीएकडे संख्याबळ चांगले असल्याने राष्ट्रपती निवडणूकीत एनडीचाच उमेदवार विजयी होईल, असे भाकीतही पटेल यांनी केले. विरोधक जिंकू शकत नसल्याचे विधान करून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी काॅग्रेसची हवा काढून टाकली आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की, एनडीएचा उमेदवार स्वच्छपणे निवडणूक जिंकणार, विरोधक एक उमेदवार निवडून देईल अशी विरोधकांची संख्या नाही,  एनडीएने विरोधकांना विश्वासात घेतले तर बिनविरोध होऊ शकते. राष्ट्रपती पदाचा उमेदवार सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ठरवावे. इतर पक्षांनी पवारांनी उमेदवार असण्याची मागणी केली. पवार साहेब राष्ट्रपती उमेदवार नाही.  उमेदवार निवडण्यासाठी शरद पवार मदत करतील.

युती टिकवण्याची जबाबदारी राष्ट्रवादी एकट्याची नाही. काँग्रेस राष्ट्रवादीचा विचार करत नाही. काँग्रेस एकत्र येण्यासंदर्भात बोलते परंतू कृती करत नाही. आम्ही आमच्या पक्षाचे काम करतो गुजरात मध्ये सोबत जाण्यासंदर्भात आमची एकट्याची जबाबदारी नाही. असे पटेल यांनी स्पष्ट केले.

COMMENTS