‘राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली नाहीत’ –  सुशीलकुमार शिंदे

‘राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली नाहीत’ – सुशीलकुमार शिंदे

सोलापूरः राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली नाहीत, असा दावा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. आज (शनिवार) दुपारी काँग्रेस भवनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, “मते फुटली असे ज्यावेळी सांगितले जाते, त्यावेळी परिस्थिती उलट असते. आतापर्यंतच्या राष्ट्रपतींना झालेल्या मतदानाची टक्केवारी पाहिली तर तेच दिसून येते. या निवडणुकीत “क्रॉस व्होटींग’ झाल्याची शक्‍यता आहे. कारण अनेक पक्षांची आघाडी, युती आहे. त्यामुळे कुणी कुणाला मतदान केले हे लवकर समजणार नाही.”

कर्जमाफीसंदर्भात बोलताना शिंदे म्हणाले, “शासनाने घेतलेल्या निर्णयाचे आदेश अद्याप खालच्या यंत्रणेपर्यंत पोचलेले नाहीत. त्यामुळे प्रत्यक्षात कर्जमाफी कधी मिळेल हे आताच सांगता येत नाही.”

 

 

 

COMMENTS