राष्ट्रपती निवडणूक : छगन भुजबळ आणि रमेश कदम यांनीही केले मतदान

राष्ट्रपती निवडणूक : छगन भुजबळ आणि रमेश कदम यांनीही केले मतदान

देशाच्या 14व्या राष्ट्रपतीसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद विरुद्ध काँग्रेसप्रणीत संयुक्‍त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात  थेट लढत आहे.  मात्र पाठिंब्याचा विचार केला तर सध्या तरी कोविंद यांचे पारडे जड मानले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी मतदानला केले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मतदान केले.

जेलमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि आमदार रमेश कदमही यांनाही मतदानाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं हे दोघेही मतदान करतील. पैशांच्या अफरातफरीप्रकरणी छगन भुजबळ सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहेत. तर रमेश कदम हे अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणात भायखळा जेलमध्ये आहेत. या दोघांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करु द्यावं, अशी मागणी पीएमएलए कोर्टाकडे केली होती. त्यांची ही मागणी मान्य झाली आहे. भुजबळ आणि रमेश कदम यांना पोलिस संरक्षणात जेलमधून विधानसभेत मतदानासाठी नेण्यात येईल. तिथे मतदान झाल्यानंतर त्यांना पुन्हा जेलकडे नेण्यात येईल.

COMMENTS