राष्ट्रपती, पंतप्रधान आजपासून दोन दिवस महाराष्ट्रात

राष्ट्रपती, पंतप्रधान आजपासून दोन दिवस महाराष्ट्रात

पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदिवसाच्या नागपूर दौ-यावर येत आहेत. दीक्षाभूमीवर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्ष समारोहास ते उपस्थित राहणार आहेत. तसंच कोराडी थर्मल पॉवर स्टेशनचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.  मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित शासनाच्या विविध प्रकल्पाचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होईल. डिजीधन मेळावाचा समारोप आणि  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी या विशेष टपाल तिकीटाचे प्रकाशन करुन तिथे ते भाषणही करणार आहेत.

राष्ट्रपति प्रणव मुखर्जी आज पासुन दोन दिवसीय नगर दौ-यावर येणार आहेत. शनिवारी लष्कराच्या एसीसी & एस या लष्करी प्रशिक्षण संस्थेचा राष्ट्रपतिंच्या हस्ते होणार गौरव आहे. एसीसी & एस चे कमांडिंग ओफिसर मेजर जनरल प्रवीण दीक्षित हे विशेष सन्मान स्विकारणार आहेत. एसीसी & एस च्या उत्कृष्ट लष्करी कामगीरी बद्दल होणार गौरव होणार आहे. राष्ट्रपतींचे आज संध्याकाळी मुक्कामी नगर मधे आगमन होणार आहे. लष्करा आणि जिल्हा प्रशासनाकडून दौ-याची चोख तयारी करण्यात आली आहे.

COMMENTS