सातारा – राष्ट्रवादीच्या पोस्टरवरुन खासदार उदयनराजे गायब !

सातारा – राष्ट्रवादीच्या पोस्टरवरुन खासदार उदयनराजे गायब !

सातारा – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या राज्यभरात राष्ट्रवादीचे जिल्हानिहाय मेळावे घेत आहेत.  आज त्यांचा सातारमध्ये मेळावा आहे. त्यासाठी कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेल्या पोस्टरवर पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांचा फोटो नाही. राज्यातील सर्व बडे नेते जिल्ह्यातील आमदार इतर पदाधिकारी यांचे फोटो पोस्टरवर आहेत. मात्र उदयनराजे भोसले यांचा फोटो त्या पोस्टरवर नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

 

नगरपालिका निवडणूक आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली नव्हती. उदयनराजे यांचे रामराजे निंबाळकर आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी बिनसले आहे. त्यामुळे तर उदयनराजे यांचा फोटो पोस्टरवरुन गायब झाला नाही ना ? असाही प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

COMMENTS