राहुल गांधींवर टीका करताना बबनराव लोणीकरांची जीभ घसरली !

राहुल गांधींवर टीका करताना बबनराव लोणीकरांची जीभ घसरली !

परभणी – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मराठवाडा दौऱ्यात मोदी सरकारवर कडाडून टीका केली होती. यावर पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी राहुल गांधीवर निशाणा साधला. त्यांनी मोदींवर टीका केली तर ‘ईट का जवाब पत्थर से’ देण्यात येईल, असे वक्तव्य परभणीत आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
लोणीकर यांनी राहुल गांधी यांची नक्कल करत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही आक्षेपार्ह टीका केली. ‘ज्याला कुणी पोरगी देत नाही, ज्याचे लग्न होत नाही तो मोदी, मोदी का करतो?  भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे पुतळे जाळायला पाहिजे होते. आपल्या नेत्यावर जर कुणी टीका करत असेल तर ‘ईट का जवाब पत्थर से’ देण्यात यावा असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. टीका करणार्‍यांची सभा उधळा, पुतळे जाळा आणि त्यांचा निषेध करुन बातम्या छापून आणा, असे चिथावणीखोर धडे लोणीकरांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिले.

COMMENTS