लवकरच हॉटेलमधील सर्व्हीस चार्ज बंद होणार

लवकरच हॉटेलमधील सर्व्हीस चार्ज बंद होणार

नवी दिल्ली – हॉटेलमध्ये गेल्यावर अनेकवेळा आपल्याला सर्व्हीस चार्ज द्यावा लागतो. मात्र यापुढे या सर्व्हिस चार्जमधून सगळ्यांची सुटका होण्याची शक्यता आहे. हा अवैध सर्व्हीस चार्ज  रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी ही माहिती दिलीय. सर्व्हीस चार्ज हा कायद्यानुसार अयोग्य आहे. नियमबाह्य प्रकारे तो आकारला जातो. हा नियमबाह्य प्रकार रोखण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा खात्याने आता त्याचा एक प्रस्ताव तयार केला आहे. तो प्रस्ताव मंजुरीसाठी पंतप्रधान कार्य़ालयाला पाठवण्यात आला आहे. एकदा का तिथून मंजुरी मिळाली की तो सर्व राज्य सरकारे आणि केंद्र शासीत प्रदेशांना पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व्हीस चार्ज बंद होईल. ग्राहक स्वईच्छेने टीप वगैरे देऊ शकतील मात्र त्यांच्यावर कुठल्याही प्रकराचा सर्व्हिस चार्ज आकारता येणार नाही.

COMMENTS