लातूर, चंद्रपूरात भाजपला स्पष्ट बहुमत तर, परभणीत आघाडीला कौल

लातूर, चंद्रपूरात भाजपला स्पष्ट बहुमत तर, परभणीत आघाडीला कौल

लातूरमध्ये नगरपालिका असो किंवा महानगर पालिकेच्या स्थापनेपासून अपराजीत असलेल्या काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. अमित देशमुंखांचा गढ ढासळला आहे. तर गेल्यावेळी झिरो असलेला भाजप यावेळी हिरो झाला आहे. लातूर  महापालिकेत भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. भाजपानं 70 जागांपैकी भाजपनं 36 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला 33 जागांवर समाधान मानावं लागलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 1 जागा मिळाली आहे. शिवसेनेला इथे भोपलाही फोडता आला नाही.

परभणीत गेल्यावेळी नंबर एकचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला या निवडणुकीत जोरदार धक्का बसला असून काँग्रेसने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. मात्र त्यांनाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही. बहुमतासाठी 33 जागा असताना त्यांना 31 जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 18 जागा मिळाल्या आहेत. गेल्यावेळी राष्ट्रवादीला 30 जागा होत्या. त्यामध्ये 10 ने घट झाली आहे. तर काँग्रेसनं 23 वरुन 31 वर झेप घेतली आहे. भाजपच्या जागा 2 वरुन 8 झाल्या आहेत. शिवसेनाला 6 जागा मिळाल्या आहेत.  स्थानिक तगडं नेतृत्व आणि खासदार, आमदार यांचं बळ असतानाही शिवसेना चौथ्या क्रमांकवर फेकली गेली आहे.  अपक्षांना 2 जागा मिळाल्या आहेत.

चंद्रपूरमध्ये लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद आणि आता महापालिका जिंकण्यातही भाजपला यश मिळालं आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याचा फायदा या ठिकाणी भाजपला मिळाला आहे. राज्यातले अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी हा विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला आहे. एकूण 66 पैकी भाजपनं 36 जागांसह स्पष्ट बहुमत मिळाले आहे. काँग्रेस 12 शिवसेना 2,  राष्ट्रवादी 2, मनसे 2,  बसपा 8, अपक्ष 4 जागांमध्ये बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप देशमुख यांचा समावेश आहे.

 

COMMENTS