लालकृष्ण अडवाणी असू शकतात पुढचे राष्ट्रपती, गुरूदक्षिणा देण्याचे पंतप्रधान मोदींनी दिले संकेत

लालकृष्ण अडवाणी असू शकतात पुढचे राष्ट्रपती, गुरूदक्षिणा देण्याचे पंतप्रधान मोदींनी दिले संकेत

अहमदाबाद -उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत मिळालेल्या बहुमताच्या यशानंतर आता भाजपला त्यांना हवा तो राष्ट्रपती बनवता येणार आहे. त्यासाठी अपेक्षेप्रमाणे लालकृष्ण अडवाणींचे नाव समोर आले आहे. निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी 8 मार्चला सोमवाथ येथे एका बैठकीत याबाबत चर्चा झाली होती. त्यात नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह अडवाणीदेखिल उपस्थित होते. मोदींनी या बैठकीत त्यांच्याकडून अडवाणींना ही गुरूदक्षिणा देण्याचे संकेत दिले होते. निकालांनंतर आता अडवाणींचे नाव अंतिम मानले जात आहे.

सोमनाथमध्ये झाली होती खास बैठक

– सोमनाथमध्ये जालेल्या त्या खास बैठकीत मोदी, शहा, अडवाणी यांच्याबरोबर केशुभाई पटेलही उपस्थित होते. त्याचवेळी मोदींनी संकेत दिला होता की, जर उत्तर प्रदेशच्या निवडणुकांचे मनासारखे निकाल लागले तर, ते त्यांचे गुरू म्हणजे अडवाणींना राष्ट्रपती पदावर बसवू इच्छितात. याच वर्षी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका सुरू होतील.

सोमनाथ यात्रेपासून सुरू झाली होती मोदींची राष्ट्रीय कारकीर्द

– अडवाणी आणि मोदींची सोमनाथमध्ये झालेली भेट अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. 1990 मध्ये आडवाणींनी सोमनाथपासून अयोध्येपर्यंत यात्रा केली होती. त्यावेळी मोदींना त्यांनी त्यांचा सारथी म्हणून प्रोजेक्ट केले होते.

– त्याचवेळी मोदींची राष्ट्रीय राजकारणात एंट्री झाली होती. मोदींना गुजरातचा मुख्यमंत्री बनवण्यातही अडवाणींची महत्त्वाची भूमिका होती. 2002 च्या गुजरात दंगलींबाबत जेव्हा वाजपेयी मोदींवर नाराज झाले होते, त्यावेळीही अडवाणींनी मोदींचा बचाव केला होता.

युपीच्या निकलांनी मत बदलले

– 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जेव्हा मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केले गेले तेव्हा अडवाणींनीच विरोध सुरू केला होता. तरीही मोदी पंतप्रधान बनले. तेव्हापासूनच अडवाणींनी मौन धरले होते. त्यानंतर दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचे मानले जात होते.

– पण युपीसह 5 राज्यांतील निवडणुकांच्या निकालांनंतर अडवाणींनी तडजोडीचे धोरण अवलंबले आहे.

COMMENTS