लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन राजू शेट्टी आज करणार नव्या वाटचालीला सुरूवात !

लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन राजू शेट्टी आज करणार नव्या वाटचालीला सुरूवात !

मुंबई – स्वाभीमानी शेतकरी संघटनेनं काही दिवसांपूर्वीच सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्यावर औपचारिकतेची मोहर खासदार राजू शेट्टी आज उमटवणार आहेत. आज दुपारी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांसह खासदार राजू शेट्टी हे मुंबईतील लालबागचा राजाचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर वर्षावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रवी तुपकर आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा राजीनामा सुपूर्द करणार आहेत.

 

COMMENTS