लालूप्रसाद यांना आणखी एक धक्‍का !

लालूप्रसाद यांना आणखी एक धक्‍का !

राष्‍ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव आणि परिवाराच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाहीत. मुलगा तेजस्‍वी यादव याच्याबाबत सुरू असणारा वाद थांबायचा आहे. तोपर्यंत दुसरा मुलगा तेज प्रताप हा नव्या अडचणीत सापडला आहे. त्याचा पेट्रोलपंपाचा परवाना रद्‍द करण्यात आला आहे.  पटना येथील बेवूर परिसरात असणारा पेट्रोलपंप बंद करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. तसेच तेजप्रतापकडे असणारा भारत पेट्रोलिअमचा पेट्रोलपंप परवाना रद्‍द करण्यात आला आहे.

याबाबत भारतीय जनता पक्षाने तेज प्रतापवर फसवणुकीचा आरोप केला होता. भारत पेट्रोलिअमकडून परवाना मिळवण्यासाठी दुसर्‍याची जमीन आपल्या नावे दाखविल्याचा आरोप भाजपने केला होता. याप्रकरणी चौकशी करून न्यायालयाने तेज प्रतापचा परवाना रद्‍द करण्याचे आदेश दिले आहेत.

 

COMMENTS