विरोधी पक्षाचे 19 आमदार निलंबित

विरोधी पक्षाचे 19 आमदार निलंबित

मुंबई – अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळ घालणारे विरोधी पक्षाचे 19 आमदारांचं निलंबिन करण्यात आलंय.  सभागृहमध्ये तीन दिवसांपूर्वी अर्थसंकल्पीय भाषण सुरु असतांना जे आमदार असभ्य,  घटनेविरुद्ध वागले ते खुप वाइट आहे. मत मांडायचा अधिकार आहे. मात्र तरी आत्तापर्यन्त कधीही जे झाले नाही ते अर्थसंकल्प जाळणे,  विधि मंडळमध्ये आणि बाहेर वागणे अशा 19 आमदारांना 31 डिसेंबर पर्यन्त निलंबित केले जात आहे. अशी माहिती संसदीय काममकाज मंत्री गिरीष बापट यांनी सभागृहात दिली. निलंबित करण्यात आलेल्या आमदारांमध्ये अमर काळे, , भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार, डॉ.  मधुसूदन केंद्रे,  हर्षवर्धन सकपाल, कुणाल पाटील,  जयकुमार गोरे, संग्राम थोपटे  नरहरी झिरवळ,  जितेंद्र आव्हाड,, दीपक चव्हाण,  राहुल जगताप,  दत्ता भरणे,  संग्राम जगताप,  अवदूत तटकरे,  अमित झणक,  वैभव पिचड़, डी पी. सावंत यांचा समावेश आहे.

 

दरम्यान विरोधी पक्षांनी सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. अजित पवार यांच्यावेळी घातलेला गोंधळ हा तेव्हा विरोधी पक्षांनी शेतकरी कर्जमाफी वर घातलेला नव्हता. तर तेव्हा संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष पद मिळावे या कारणाने घातला होता. सभेत बहुमत असावे यासाठी असा निर्णय सत्ताधारी यांनी घेतला आहे अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. तर फडवणीस सरकार अल्प मतात येईल की काय म्हणून हे निलंबन करत विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम केले जात आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलीय.

COMMENTS