विषबाधा होऊन 18 शेतकऱ्यांच्या मृत्युप्रकरणाची चौकशीसाठी एसआयटी स्थापना करा – राधाकृष्ण विखे पाटील

विषबाधा होऊन 18 शेतकऱ्यांच्या मृत्युप्रकरणाची चौकशीसाठी एसआयटी स्थापना करा – राधाकृष्ण विखे पाटील

यवतमाळ जिल्ह्यात विषबाधा होऊन 18शेतकऱ्यांच्या मृत्युप्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष चौकशी पथकाची (एसआयटी) स्थापना करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

विखे पाटील यांनी आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या मागणीचे निवेदन सोपवले. या गंभीर प्रकरणाची वेळीच दखल न घेतल्यामुळे राज्याचे कृषि आयुक्त, विभागीय कृषि सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सकांना तातडीने निलंबीत करावे. त्यासोबतच संबंधित औषध कंपन्यांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे आणि पीडित शेतकरी व त्यांच्या कुटुंबांना तात्काळ भरीव आर्थिक मदत द्यावी, अशीही मागणी त्यांनी याप्रसंगी केली.

 

COMMENTS