वेगळ्या विदर्भासाठी ‘रक्त स्वाक्षरी’ मोहिमेला सुरुवात

वेगळ्या विदर्भासाठी ‘रक्त स्वाक्षरी’ मोहिमेला सुरुवात

नागपूर – आज राज्यात 1 मे ला महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस साजरा होत आहे. मात्र, दुसरीकडे विदर्भवाद्यांकडून वेगळ्या विदर्भाच्या मागणीकडे देशातील जनतेचे आणि पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी ‘रक्त स्वाक्षरी’ मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्या रक्तांकित स्वाक्षरीचे पत्र  पाठविण्यात येत आहे. या निवेदनाला विदर्भवाद्यांच्या रक्ताने केलेल्या स्वाक्षऱ्या जोडण्यात येत आहेत.

दरम्यन, वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भावाद्यांनी धरमपेठ येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी 7 ते 8 आंदोलकांना ताब्यात घेतले.  विदर्भवादी आज महाराष्ट्रदिन हा काळा दिवस म्हणून पाळत आहेत. भाजपने विदर्भ राज्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ आंदोलकांनी कॉफी ऑफीस चौकात भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात  विरोधात घोषणा दिल्या.
यावेळी धरमपेठेतील मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानाजवळ आंदोलकांनी निदर्शने करुन स्वतंत्र विदर्भाची मागणी केली. पोलिसांनी आंदोलनकांना त्वरीत ताब्यात घेतल्याने आंदोलन सुरू होण्यापूर्वीच संपले होते.

COMMENTS