‘शरद पवारांनी राष्ट्रपतीपदासाठी नाही म्हणू नये’ –  प्रतिभाताई पाटील

‘शरद पवारांनी राष्ट्रपतीपदासाठी नाही म्हणू नये’ – प्रतिभाताई पाटील

पुणे – राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यातच माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी ही शरद पवारांनी राष्ट्रपतीपदासाठी नाही म्हणू नये असं म्हटलं आहे. पुण्यात बालगंधर्व येथे शरद पवारांनी राजकारणातील 50 वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने कार्यक्रम योजीत केला होता.  त्यावेळी प्रतिभाताई पाटील व शरद पवार एकत्र आले होते. या कार्यक्रमात प्रतिभाताई पाटील यांनी पवार यांनी राष्ट्रपतीपदासाठी नाही म्हणू नये अशी इच्छा व्यक्त केली.

‘राष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेतले जात आहे आणि त्यांचा नकारही असल्याचे मी ऐकले आहे. परंतु राष्ट्रपतीपदासाठी त्यांनी नाही म्हणू नये. ते कधी सल्ला मागत नाहीत, परंतु मी माझे विचार सांगते’, असे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी म्हटले आहे.

प्रतिभाताई पाटील म्हणाल्या, की राजकारणात मी शरद पवारांना सिनियर आहे. शरद पवारांनी स्मरणशक्ती विलक्षण आहे. आपल्या मतदार संघातील कार्यकर्त्यांसोबतच विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांची नावे त्यांना माहीत असतात. ते एक विलक्षण बुद्धिमत्ता असलेले व्यक्तित्व आहेत. शरदरावनी राजकारणातील 50 वर्षे पूर्ण केली हे खूप मोठी बाब आहे. वेगवेगळ्या राजछटांचे व्यक्तीमत्व म्हणजे शरद पवार. 50 वर्षानंतर जेव्हा कधी भारतातील राजकारणाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख होईल.

 

COMMENTS