शरद पवार यांना पद्मविभूषण प्रदान

शरद पवार यांना पद्मविभूषण प्रदान

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांना पद्मविभूषण तर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

राष्ट्रपती भवनातील शानदार सोहळ्यात पद्म पुरस्कार विजेत्या सर्व मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

 

राष्ट्रपतींच्या हस्ते सात पद्मविभूषण, सात पद्मभूषण आणि ७५ पद्मश्री असे एकूण ८९ पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये १९ महिला तसेच पाच परदेशी आणि भारतीय वंशाच्या व्यक्तींचा समावेश आहे. सहा जणांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. प्रसिद्ध गायक कैलाश खेर, नामवंत चित्रपट समीक्षक भावना सोमय्या, हागणदारीमुक्त गावासाठी समर्पित स्वच्छतादूत दिवंगत डॉ. मापुस्कर या सात मानकऱ्यांसह उत्तर प्रदेशातील डॉ. मदन माधव गोडबोले आणि तामिळनाडूतील निवेदिता रघुनाथ भिडे या मराठी भाषिकांनाही पद्म पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

 

COMMENTS