“शरद पवार, सुप्रीया सुळेंसारखे राज्यात 40 लाख नामधारी शेतकरी”

“शरद पवार, सुप्रीया सुळेंसारखे राज्यात 40 लाख नामधारी शेतकरी”

पुणे – राज्यात 10 लाख बोगस शेतकरी असल्याचं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केलं होतं. त्यावरून त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती. आता तर राज्यात 10 लाख नाही तर तब्बल 40 लाख नामधारी शेतकरी असल्याचा दावा शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे. 2008 मध्ये अशा नामधारी शेतक-यांनी कर्जमाफीचा लाभ उठवला होता. यावेळी मात्र तसं होऊ देणार नाही असं तिवारी यांनी म्हटलं आहे. त्याचवेळी एकही गरजू शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही असंही त्यांनी म्हटलंय. दीड लाख रुपयांच्यया सरसकट कर्जमाफीस पात्र शेतक-यांच्या खात्यात येत्या दस-याच्या मुहूर्तावर पैसे जमा होतील अशी माहितीही तिवारी यांनी दिली आहे.

COMMENTS