शिवाजी महाराज हे गोब्राम्हण प्रतिपालक नव्हतेच – छत्रपती संभाजीराजे

शिवाजी महाराज हे गोब्राम्हण प्रतिपालक नव्हतेच – छत्रपती संभाजीराजे

औरंगाबाद –  छत्रपती शिवाजी महाराज हे गोब्राम्हण प्रतिपालक नव्हते असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात केलं होतं. त्यावरुन शरद पवार यांच्यावर सोशल मीडियातून बरीच टीका झाली होती. त्याच्यावरुन उठलेल वादंग शमतं न शमतं तोच आता छत्रपती संभाजीराजे यांनी तसंच वक्तव्य केलं आहे. शिवाजी महाराज हे गोब्राम्हण प्रतिपालक नव्हते तर ते कुळवाडीभूषणच होते असं वक्तव्य खासदार संभाजीराजे यांनी केलं आहे. त्यावर आता काय प्रतिक्रिया उमटतात ते पहावं लागेल. औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त राजर्षी शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज अध्यास केंद्रातर्फे आयोजित केलेल्या व्याख्यानात खासदार संभाजीराजे बोलत होते. बारा बलुतेदारांना घेऊन त्यांनी स्वराज्याचा संकल्प केला आणि तो तडीस नेला असंही सभाजीराजे म्हणाले. अनेक मुस्लिम शिवाजी महाराजांच्या राज्यात मोठ्या हुद्यावर होते. त्यामुळे त्यांना एका जाती धर्माच्या बंधनात ठेवणे हे योग्य नाही असंही संभाजीराजे म्हणाले.

COMMENTS