दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे !

दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे !

…………………………………………………………………………………

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

वेळ जेंव्हा येईल तेंव्हा मी निर्णय घेईन.

आंदोलन करा पण व्यक्तीगत टीका टिपण्णी नको, पंतप्रधानांच्या विरोधात चुकीच्या घोषणा नको.

नवसाचं बाळ म्हणून तुमच्यावर जनतेनं प्रेम केले होते, आता हे नवसाचं बाळ वाहवत चाललं आहे.

शिवेसना शेतक-यांच्या बाजुने आहे.

हिंदुमध्ये फूट पाडू नका, मराठी माणसामध्ये फूट पाडू नका.

शरद पवारसाहेब आम्ही तुमच्यासारखी लपत छपत मदत करत नाही, आम्ही शिवसेनाप्रमुखांचा शिष्य आहे.

एका हातानं द्यायचं आणि दुस-या हातानं घ्यायचं, हा तुमचा कसला कारभार ?

गाईला जपायचं ताईला मारायचं हे कसलं हिंदुत्व ?

गाय मारल्यानंतर जास्त शिक्षा, माणूस मारल्यावर कमी शिक्षा हे कसे

तुमची गाईची व्याख्या काय ? महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये वेगळी कशी ?

आम्ही सावरकरवादी आहोत ? गाय हा एक उपयुक्त पशू आहे.

कुठे गोमांस दिसले तर माणसांना तुम्ही चिरता, मग शेजारच्या गोव्याचे तुमचे मुख्यमंत्री तुम्हाला गोमांस देतो असे म्हणतात हे कसे ?

जेएनयूमधील विद्यार्थी, हार्दिक पंड्या देशद्रोही कसे ?

तरुणांसाठी सरकारने काय केले ? मुंबईतल्या विद्यार्थ्यांनी परिक्षा देऊनही त्यांचे निकालसुद्धा लावले जात नाहीत.  त्यांच्या हातात आज लॅपटॉप आहे. त्यांनी हातात बंदुका घेतल्या तर  काय होईल ?

समाजातल्या कोणत्या घटकाला यांनी त्रासाशिवाय काहीही दिलं नाही.

शिवेसेनेला संपण्याच्या फंदात पडू नका,

काश्मिरमध्ये लाचार होऊन उपमुख्यमंत्रीपद भोगत आहात, तसंच बिहारमध्येही.

काश्मिरला विशेष अधिकार देणारा कायदा रद्द करण्याचं धाडस दाखवणार का ?  तुमची ही तिरंग्याशी गद्दारी करत आहात. आणि कश्मिरमध्ये सत्ता भोगत आहात.

ही जनता शेळामेंढ्यासारखी आहे असे समजू नका, इथल्या तरुणांनी इंग्रजांना घालवले आहे, त्यांना घालवणा-यांपैकी इथला क्रांतिकारक होता.

लाखो लोकांच्या नोक-या गेल्या, विकास दर कमी झाला, मग नोटबंदीचा काय फायदा.

आम्हाला देशभक्ती शिकवू नको, आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी देशभक्ती काय ते शिकवलं आहे .

नोकबंदी का केली, कशाला केली काहीच माहिती नाही, काळा पैसा तसाच आहे, दहशतववाद तसाच आहे, मग नोटबंदीचा उपयोग काय ?  नोटबंदीला विरोध करणारा शिवसेना हा पहिला पक्ष आहे.

जीएसटीसाठी शिवसेनेनं लढा दिला नसता, तर राज्यातल्या 27 महापालिकांचा महसूल बुडाला असता.

इस देश मे रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा, अशी घोषणा निवडणूकी आधी दिली होती, आता भाजपचे मंत्री म्हणत आहेत की वंदे मातरम्  म्हणणे के सक्तीचे नाही.

बुलेट ट्रेन म्हणज्ये फुकट्याचा नाबोबा

फालतू मानवता वाद नको, रोहिंग्यांना देशात घेेऊ नका.

थापा मारु नका, 45 रुपये लिटरने पेट्रोल द्या, तुम्हाला जनता डोक्यावर घेईल, शिवसेनाही तुमच्या पाठिशी राहिल.

देशात पाच जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवा, नाहीतर मोदी तुमचे काही खरे नाही .

ज्या अपेक्षेने जनतेने निवडूण दिले आहे, त्या पूर्ण करा – उद्धव

शिवेसेनेच्या खासदारांनी पूल रुंद करण्यासाठी पूर्वीच कधी पत्र लिहिलं मात्र त्यावर काहीही कारवाई केली नाही.

सर्वजण म्हणतात चिखलात कमळ असतं, मात्र कमळ कुठे दिसतच नाही, सगळीकडे चिखलच दिसत आहे .

पुढे कुणीही असले तरी मी घाबरत नाही – उद्धव

शिवसैनिकांसारखी शस्त्र मला मिळाली हे माझं भाग्य समजतो, त्याच्याच जोरावर सर्वसामान्यांसाठी लढतो

COMMENTS