शेतकरी संपाचा चौथा दिवस: अनेक ठिकाणी वाहने अडविली, दूध, भाजीपाला रस्त्यावर

शेतकरी संपाचा चौथा दिवस: अनेक ठिकाणी वाहने अडविली, दूध, भाजीपाला रस्त्यावर

शेतकरी संप आज (रविवार) चौथ्या दिवशीही सुरूच असून, शेतकरी आंदोलन करत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत देण्यात आलेली आश्वासनं आपल्याला मान्य नसून आमच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरु ठेवणार असल्याचं पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर शुक्रवारी किसान क्रांतीच्या शिष्टमंडळाने संप घेतल्याचे जाहीर तर केले होते. मात्र अनेक शेतकरी संघटनेमध्येच फूट पडल्याने काहींनी जोपर्यंत सर्वच मागण्या पूर्ण होणार नाही. तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याची घोषणा केली.

आजही राज्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरवात केली. नगर-कल्याण मार्गावर माळशेजजवळ आंदोलक शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन जाणारे वाहन पेठवले आहे. शहरात भाजीपाला घेऊऩ जाणारे ट्रक अडवून त्यांची नासाडी करणाऱ्या सुमारे 150 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  अहमदनगरच्या पारनेर तसेच विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर दूध ओतले व भाजीपाला फेकून शासनाचा निषेध केला.

नाशिक – मनमाडमध्ये नांदगाव तालुक्यातील भालूर येथे संपकरी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्रीच्या पुतळ्याचे दहन करून सरकारच्या विरोधात घोषणा बाजी करत आदिवासी पाड्यावर मोफत दूध वाटले…

उस्मानाबाद जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन केले. शेतकरी व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आठवडी बाजार बंद पाडला. त्यामुळे शहरासह बाजारपेठेत शुकशूकाट दिसून येत होता. जिल्ह्यात ठिकठीकाणी शेतकऱ्यांनी दूध तसेच भाजीपाला रस्त्यावर फेकून देत निषेध नोदविला.

COMMENTS