शेतकरी संप मागे घेतल्याचा पश्चाताप होत आहे – जयाजी सूर्यवंशी

शेतकरी संप मागे घेतल्याचा पश्चाताप होत आहे – जयाजी सूर्यवंशी

मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर मध्यरात्री शेतकऱ्यांचा संप घाईघाईत मागे घेतला, या निर्णयाचा पश्चाताप होत असल्याची कबूली शेतकरी आंदोलनातील नेते जयाजी सूर्यवंशी यांनी आज (शनिवार) दुपारी दिली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या तब्बल चार तासांच्या बैठकीनंतर संप मागे घेत असल्याची घोषणा मुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी केली होती. ज्या प्रतिनिधींनी ही घोषणा केली त्यामध्ये जयाजी सुर्यवंशी यांचाही समावेश होता. सुर्यवंशी यांच्या भूमिकेबाबत शेतकऱ्यांनी शंका उपस्थित करायला सुरूवात केली. संपात फूट पाडण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी जयाजी यांना हाताशी धरल्याची टीका सुरू झाली. या पार्श्वभूमीवर वृत्तवाहिनीशी बोलताना सूर्यवंशी यांनी संप मागे घेतल्याचा पश्चाताप असल्याचे सांगितले.

जयाजी सूर्यवंशी हे संभाजीनगर येथील अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत. सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते सक्रिय होते; नंतर उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत त्यांनी मागील विधानसभा निवडणुकीवेळी मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने जयाजी शेतकरी आंदोलनात सक्रिय झाले.

COMMENTS