शेतकऱ्यांच्या संपाच्या आडून विरोधकांचा हिंसेचा डाव, मुख्यमंत्र्यांचा आरोप

शेतकऱ्यांच्या संपाच्या आडून विरोधकांचा हिंसेचा डाव, मुख्यमंत्र्यांचा आरोप

शेतकऱ्यांच्या संपाच्या आडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हिंसेचा डाव आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडावी, असं त्यांचं नियोजन असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
# बँकर सोबतच्या शेतकऱ्यांना खरीप पिक कर्जाबाबत चर्चा
#शेतकरी संपामध्ये दुध, फळे व भाजीपाला व अन्य शेतीमाल अडवणे म्हणजे शेतकऱ्यांचेच नुकसान
#या संपात शेतकऱ्यांचेच अधिक नुकसान
#दुध संकलन केंद्राना माझे आवाहन आहे की, वाढीव भाव शेतकऱ्यांना द्यावा
#शेतकरी नेत्यांच्या मुद्द्यावर सरकार सकारात्मक

#दुध संघाने शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे भाव द्यावा

# सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक आहे. या संपाने शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. भाजीपाला  मालवाहतूक अडवली जातेय हे बरे नाही. दूध अडवले जातेय. संप हा ऐच्छिक असावा पण असे दिसत नाही – मुख्यमंत्री

# डाळींचे भाव, शेतमालाचे भाव गेल्या सरकरच्या तुलनेत अधिक आहेत

# शेतकऱ्यांची मागणी असेल तसा दूध संघाने दर दिला पाहिजे, वाढीव भावावर सरकारचे कोणते बंधन नाही.
#काही राजकीय लोक या संपाच्या आड, विशेषतः त्यांच्या संघर्ष यात्रेला काहीही प्रतिसाद मिळाला नाही, तेच लोक हिंसा करण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांची संघर्ष होऊन हा संप चिघळवा असा त्यांचा प्रयत्न आहे- मुख्यमंत्री
#12 हजार कोटी रुपयांची मदत या सरकारने केली आहे. पिकासाठी गेल्या सरकारने केवळ 4 हजार कोटी दिले होते.

COMMENTS