शेतक-यांच्या बाबतीत चुकीचं घडत असेल तर शांत बसणार नाही, नाना पटोलेंचा पुन्हा हल्लाबोल !

शेतक-यांच्या बाबतीत चुकीचं घडत असेल तर शांत बसणार नाही, नाना पटोलेंचा पुन्हा हल्लाबोल !

मुंबई – भाजपमधील सर्वशक्तीमान पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी आणि राज्यातल्या सरकावरही टीका करण्याचं धाडस दाखवणारे भंडारा गोंदियाचे खासदार नाना पटोले यांचा राग शांत झालेला दिसत नाही.  स्वपक्षाच्या सरकारवर टीका केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पटोले यांना समजवण्याचा प्रय़त् केला. त्यामुळे काल झालेल्या पत्रकार परिषदेत ते स्वपक्षातील आपल्या वादावर पडदा टाकतील अशी अपेक्षा होती. मात्र सरकावरचा हल्लाबोल त्यांनी कालही सुरूच ठेवला.

माझा स्वभाव थेट बोलण्याचा आहे. त्यामुळे शेतक-यांच्या ऑनलाईन कर्जमाफी अर्जाला विरोध केला. ग्रामिण भागातील अडचणी मला चांगल्या माहित आहेत. त्यामुळे त्याला विरोध केला. सरकार काही चुकीचं करत असेल, शेतक-यांबाबत काही चुकीच घडत असेल तर नाना पटोले शांत बसणार नाही. सरकारला चूक असेल तर चूक म्हणून सांगणारच असंही पटोले म्हणाले.

चंद्रकांत पाटील हे शेतकरी बोगस आहेत हे कसं काय म्हणून शकतात ? असा सवाल करत चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य चुकीचं असल्याचंही पटोले म्हणाले. मागच्या सरकारच्या काळात आत्महत्या होत होत्या तशाच आत्महत्या याही सरकारच्या काळात होत आहेत. मग बदललं काय असा सवालही पटोले यांनी केलाय.

COMMENTS