शेतकऱ्यांचा संप मोडून सदाभाऊंनी चळवळीचा घात केला, राजू शेट्टींची जोरदार टीका

शेतकऱ्यांचा संप मोडून सदाभाऊंनी चळवळीचा घात केला, राजू शेट्टींची जोरदार टीका

स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व  त्यांचेच सहकारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील दरी गेल्या काही दिवसांत चांगलीच वाढली आहे. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाही. ‘शेतक-यांचा संप मोडून सदाभाऊंनी चळवळीचा घात केले’, अशी जोरदार टीका शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर केली. तसेच शेतकरी संपामध्ये स्वाभिमान शेतकरी संघटना सहभागी होणार आहे. असे राजू शेट्टी यांनी आज कोल्हापूरात सांगितले.

यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, मोठ्या संख्येने अल्पभुधारक शेतकरी आहेत हे मुळात पटत नाही. चर्चेला गेलेल्या शेतकरी यांचा अभ्यास तोकडा पडल्यामुळे सरकारने त्यांची फसवणूक केली आहे. मोदींनी दिलेल्या आश्वासन प्रमाणे स्वामीनाथन आयोग अमलात आणला असता. तर आत्ताचा प्रश्न उपस्थित झाला नसता. सदाभाऊ यांनी छातीवर जो बिल्ला लावला त्याच्याशी ते प्रामाणिक राहिले नाहित…त्यांची लुडबुड आम्हाला मान्य नाही…सदाभाऊ यांनी संप मोडून काढण्याचा प्रयत्न केलाय आणि चळवळीचा घात केलाय. त्याच आम्ही समर्थन करत नाही. कार्यकारणी मधे त्यांना योग्य जाब विचारु असे शेट्टी म्हणाले.

शेतकरी शेतीमालाच नुकसान करतायत अशी ओरड करत आहेत… पण आरोप करणा-यांना शेतकरी संकटात आहेत हे कळत नाही का? जर शेतक-याने शेतीकडे पाठ फिरवली तर काय होईल याचा विचार करा.. शेतक-याची बदनामी करण्याचा प्रयत्न कुणी करु नये. 16 जुन रोजी दिल्लीमधे देशातील शेतकरी नेत्याची बैठक बोलावली असून, उद्याच्या राज्यव्यापी बंद मध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केले.

 

 

 

 

 

 

 

 

COMMENTS