विरोधकांच्या संघर्ष यात्रेला चंद्रपुरातून सुरुवात

विरोधकांच्या संघर्ष यात्रेला चंद्रपुरातून सुरुवात

शेतकरी कर्जमाफीबाबत विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेला आज चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरू होणार आहे. या यात्रेला सर्व विरोधी पक्षांचे नेते एसी बसमधून चंद्रपुरात दाखल झाले आहेत. शेतकऱ्याच्या कर्जमाफी वरून सरकारला वेठीस धरण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यापासून संघर्ष यात्रेला  सुरुवात होणार असून, येथील आत्महत्याग्रस्त बंडू करकाडेच्या कुटुंबियांना भेटून संघर्षयात्रेला सुरुवात होणार आहे. राज्यातील 16जिल्ह्यांमध्ये ही यात्रा जाणार असून 4 एप्रिल रोजी पनवेल येथे यात्रेचा समारोप होणार आहे. या संघर्ष यात्रेसाठी विरोधी पक्षांतील नेते एसी बसने चंद्रपुरात दाखल झाले आहेत.
यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, एमआयएम, जनता दल (संयुक्त) आदी पक्षांनी सहभाग घेतला आहे. काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे तर राष्ट्रवादीचे अजित पवार, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्यासह अन्य नेतेही या संघर्षयात्रेत सहभागी झाले आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, एमआयएमचे नेतेही या यात्रेत सहभागी झाले आहेत.

COMMENTS