संप तातडीने मागे घ्या – मुख्यमंत्र्यांचे डॉक्टरांना आवाहन

संप तातडीने मागे घ्या – मुख्यमंत्र्यांचे डॉक्टरांना आवाहन

मुंबई – सुरक्षेच्या मुद्यावरुन सुरू असलेल्या डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. चौथ्या दिवशीही या संपावर तोडगा न निघाल्यामुळे आता थेट मुख्यमंत्र्यांना याची दखल घ्यावी लागली. सरकारने आणि कोर्टाने कामावर हजर राहण्याचा आदेश देऊनही डॉक्टर मानायला तयार नाहीत. त्यामुळे समाजाला अशा प्रकार त्रास देण्याचा डॉक्टरांना अधिकार नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी डॉक्टरांना फटकारले. रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात चीड आणि संताप निर्माण होतोय याची दखल डॉक्टरांच्या संघटनांनी घ्यावी असंही मुख्यमंत्र्यांनी सुचवलंय. डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत सरकार मार्ग काढण्यासाठी तयार आहे, समाजाच्या व्यापक हितासाठी डॉक्टरांनी संप मागे घ्यावा असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. उपचाराअभावी कोणताही व्यक्ती दगावू नये याची काळजी डॉक्टरांनी घ्यावी असंही मुख्यमंत्री म्हणाले. विधीमंडळात मुख्यमंत्र्यांनी याबाबत निवेदन करुन सरकारची भूमिका स्पष्ट केली.

डॉक्टरांवरील हल्ले करणारांवर सरकारने कठोर कारवाई केली आहे.  डॉक्टरांवर हल्ले रोखण्यासाठी कडक शासन झालं पाहिजे म्हणून विशेष कायदे केले आहेत. यापुढेही हल्ल्यांबबत गांभीर्याने विचार केला जाईल. मात्र काही रुग्णांच्या चुकीच्या गोष्टींची शिक्षा सर्व रुग्णांना होतेय हेही डॉक्टरांनी विसरु नये असंही मुख्यमंत्री म्हणाले…. डॉक्टरांबद्दल समाजात एक विश्वास आहे. नागरिक डॉक्टरांना देवाचा दर्जा देत असतात या विश्वासाला तडा जाऊ नये याची काळजी डॉक्टरांनी घेतली पाहिजे असंही मुख्यमंत्री म्हणाले.

COMMENTS