सदाभाऊ खोत काढणार नवी संघटना !

सदाभाऊ खोत काढणार नवी संघटना !

कोल्हापूर –  ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’तून हकालपट्टी नंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नवीन संघटना काढणार  असल्याचं जाहीर केलं आहे. येत्या दसऱ्याला सदाभाऊ नव्या पक्षाबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी नवी संघटना काढून आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी लढत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. नव्या संघटनेचं नाव मात्र सदाभाऊंनी अद्याप ठरवलेलं नाही.

राज्यभरातील शेतकऱ्यांची मतं जाणून संघटनेचं नाव ठरवलं जाणार आहे. नवीन संघटनेसाठी कार्यकर्त्यांनी नावं सुचवली असल्याचंही खोत म्हणाले.

सदाभाऊ खोत यांनी नाव न घेता राजू शेट्टींवरही जोरदार टीकास्त्र सोडलं. ‘माझी हाकलपट्टी करण्याइतपत त्यांची पात्रता आहे की नाही, या बद्दल मी काहीही बोलणार नाही.. माझ्यावर जे वार झाले त्या बद्दल मला खुप मोठ दुख होतय. मला भाजप धार्जिणे म्हणणाऱ्यानी स्वता किती पक्षाच्या बरोबर किती युत्या केल्या याची यादी काढावी… आम्ही बाहेर पडणार आहे..  आम्ही बाहेर पडणार अस म्हणणारे आजुन भाजपा सोबत का ? असा सवाल खोत यांनी केला.

 

 

 

 

COMMENTS