सदाभाऊ खोत यांची आज स्वाभिमानीतून हकालपट्टी ?

सदाभाऊ खोत यांची आज स्वाभिमानीतून हकालपट्टी ?

पुणे – कृषीराज्यमंत्री आणि स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांची आज पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणीची आज पुण्यात बैठक होत आहे. त्या बैठकीमध्ये सदाभाऊ खोत यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून सदाभाऊ खोत आणि खासदार राजु शेट्टी यांच्या जोरदार मतभेद झाले आहेत. दोन्ही नेते एकमेकांना अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नाहीत. शेतक-यांच्या प्रश्नावरुन राजु शेट्टी सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. तर सदाभाऊ सरकारच्या बाजूने बोलत आहेत. शेतकरी आंदोलनात फूट पाडल्याचाही सदाभाऊ खोत यांच्यावर आरोप आहे. राज्य कार्यकारणीच्या बैठकीत आपण सदाभाऊ खोत यांना त्याचा जाब विचारु असं वक्तव राजू शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. मात्र आजच्या बैठकीत सदाभाऊ खोत हे गैरहजर राहणार असल्याचं कळतंय. त्यामुळे आता त्यांच्यावरील कारवाई ही  फक्त औपचारिकता राहिली आहे अशी पक्षात कुजबूज आहे. आजच्या बैठकीतल्या निर्णयाकडं स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या राज्यभरातल्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS