सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय आता माघार घेणार नाही – रघुनाथ पाटील

सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय आता माघार घेणार नाही – रघुनाथ पाटील

सांगली – शेतकरी संपाने सरकारचा कडेलोट होणार असून सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय शेतकरी आता माघार घेणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी दिला आहे.  देशात आता शेतकरी आणि दुर्योधन रुपी मोदी सरकार विरोधात धर्मयुद्ध सुरू झाले झाले आहे व सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय आता माघार नाही. असे पाटील म्हणाले.

रघुनाथ दादा पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की,  शेतकरी संपाला  अभूतपूर्व यश मिळत आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकाऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळणे आता गरजेचे असल्याचे यावेळी स्पष्ट केले आहे. तसेच लाखो शेतकऱ्यांची आत्महत्या कुटूंबासहित झाल्या आहेत, त्यामुळे सरकार विरोधात कडेलोट कधीना कधी होणार होता आणि तो आता झाला आहे.  तर सरकारने दडपशाही व खोट्या केसस करून कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊ नये, याने प्रश्न सुटणार नाही, असे स्पष्ट करत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि तसे न झाल्यास चार दिवसात करावा लागेल. हा संप जनतेने उभा केला आहे, त्यामुळे सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय हे संपकरी शेतकरी माघार घेणार नाहीत, असे रघुनाथ दादा पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेकांनी सरकारकडे शिष्टाई केली. मात्र दुर्योधन रुपी मोदी सरकारने हमीभाव देण्यात येणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सरकार विरोधात शेतकऱ्यांचे धर्मयुद्ध सुरू झाले असून यामध्ये सरकारचा चकनाचूर झाल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारही यावेळी रघुनाथ दादा पाटील यांनी दिला आहे. तसेच आजच्या शेतकऱ्यांची आणि देशाची स्थिती ही फ्रेंच क्रांतीप्रमाणे बनली आहे. यातून शेतकऱ्यांचे राज्य आल्याशिवाय राहणार नसल्याचे यावेळी रघुनाथ पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

स्वाभिमानची आत्मक्लेश यात्रा ही मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून काढली होती.  1 जून ला शेतकरी संप करणार होते तर यांनी 20 तारखेला आत्मक्लेश यात्रा का काढली.  1 तारखेच्या संपाकडे लोकांचे दुर्लक्ष व्हावे  या संपात लोक कमी जावेत म्हणून यांच्यासाठी आत्मक्लेश यात्रा काढली, राजू शेट्टी यांना माननारे लोक  या संपात जावे म्हणून राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आणि मुख्यमंत्र्यांनी हा केलेला कट आहे.  स्वाभिमानीचे  शेतकरी संघटनेचे रिंग मास्टर हे मुख्यमंत्री आहेत. जसे रिंग मास्टरच्या  इशा-या वर इतून तीथे सर्कस मधील वाघ, सिंह चालतात तसे  राजू शेट्टी चालले असा सणसणीत टोला रघुनाथ पाटील यांनी लगावला.

COMMENTS