Live Updete : सहाव्या दिवशीही शेतकरी संप सुरुच, अनेक ठिकाणी आंदोलने….

Live Updete : सहाव्या दिवशीही शेतकरी संप सुरुच, अनेक ठिकाणी आंदोलने….

राज्यातील शेतक-यांनी आपल्या मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाचा आज सहावा दिवस आहे, मात्र अद्याप तोडगा निघू शकलेला नाही त्यामुळे आक्रामक संप अधिक आक्रामक होण्याचे चित्र आहे. शेतक-यांनी सोमवारी पुकारलेला महाराष्ट्र बंद मुंबई वगळता सगळ्याच ठिकाणी यशस्वी झाला. काही ठिकाणी बंदला हिंसक वळणी लागले होते.

या संपावर पाच दिवसांनंतरही तोडगा निघू शकलेला नाही. बाजारपेठांमध्ये शेतमालाची आवक घटल्यानं भाज्या आणि फळांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे नागरिकांना याची मोठी झळ पोहोचत आहे.

Live Updete

 सरकारी कार्यालयांना टाळेठोक आंदोलन

राहुरी येथे शेतकऱ्यांचा वतीने राहुरी तहसिल,पंचायत समिती,तलाठी कार्यालय,तालुका कृषी अधिकारी,कृषी विद्यापिठ राहुरी येथिल कुलगुरुंचा दालनाला ताळ ठोखण्यात आले.या प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटना ,अ.भा.छावा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

वर्धा:- शेतकरी संपाच्या सहाव्या दिवशी सुद्धा शेतकरी आंदोलनात सहभागी,आर्वी तालुक्यातील सोरटा,विरूळ येथील तलाठी कार्यालयाला ठोकले टाळ, शेतकरी संघटनेचे गजानन निकम यांचा नेतृत्वात कार्यालयाला कुलुप लावून आंदोलन.

सासवड  पंचायत समिती व नगरपरिषदेला बळीराजा शेतकरी संघटनेने ठोकले टाळे ….

सोलापूरात 6 व्या दिवशी ही अंदोलन, दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाबाहेर पोलिस सुरक्षा, जिल्हाधिकारी कार्यालयाला आहे पोलिस बंदोबस्त.. पंढरपूर तहसील कार्यालयाला ठोकले अंदोलकानी  टाळे..

कुरुल जनहित शेतकरी संघटनेचा रास्ता रोको

सांगली- शासनाचा प्रतीकात्मक पुतळा  लटकवला  फासावर. वाळवा तालुक्यातील नवे खेड गावात बळीराजा शेतकरी संघटनेने केले आंदोलन.

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळ ठोकण्याचा प्रयत्न, मानवत तहसीलला ठोकल शेतकर्यानी टाळ,कुंभकर्ण टाकळी येथे राज्य महामार्ग अडवला

परभणी- मानवत तहसीलला शेतकर्यांना ठोकले टाळे…कर्जमाफीसह विविध मागण्यांचा दिल्या घोषणा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

सहा दिवसांपासून शेतकरीं संपाची धग कायम

स्वभिमानी शेतकरीं संघटनेणेच्या कार्यकत्यानी फेकला विभागीय आयूक्त व जिल्हाधिकारी निवसाससमोर भाजीपाला…. आज सकाळी विभागीय आयूक्त जे पी गुप्ता व जिल्हाधिकारी बांगर यांच्या निवास स्थाना समोर भाजीपला फेकून आंदोलन केले,यावेळी पोलीस नी कार्यकर्त्यना ताब्यात घेतले, मागील सहा दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या शेतकरीं संपाची जिल्ह्यात आजही धग कायम आहे,काल सोमवारी बंद ला जिल्ह्यातील सर्वच भागात चांगला प्रतिसाद मिळाला,होता आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी अमरावती विभागीय आयुक्त जे पी गुप्ता आणि जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या निवासस्थानी भाजीपाला फेकून आंदोलन करण्यात आले.

सांगली :- वांगी येथे शेतकरी संपास पाठीब्या साठी वांगी ग्रामस्थानी चावडी बंद आदोलन केले.

पुणतांबा ग्रामस्थांचे टाळे ठोको आंदोलन .. ग्रामस्थांनी ठोकले कार्यलयांना टाळे … पुणतांबा पोस्ट ऑफीस,मंडल कार्यालय, ग्रामपंचायतीला ठोकले टाळे

येवला तालुक्यातील सायगाव येथे सहाव्या दिवशी शेतकरी संप आंदोलन तिव्र !

नाकर्त्या भाजपा सरकारचा नावाने बोंबा मारत निषेध करत अर्धनग्न होवून शेतकऱ्यांनी मार्चा काढला.

पुणतांब्याच शेतकर्या़च ग्रामपंचायती समोर सरकारचा दहावा घालण्याच आंदोलन

शेतक-यानी घातला सरकारचा दहावा

सरकारचा निशेध म्हणुन दोन दिवसा पुर्वी केल होत मुंडण

सांगली –  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या गेटला टाळे ठोकले : स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं आंदोलन : पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा केलं आंदोलन : पोलीस आणि आंदोलकात झटापट : 20 आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात :

अमरावती विभागीय आयुक्त जे पी गुप्ता यांच्या बंगल्या समोर आणि जिल्हाधिकारी यांच्या बंगल्या समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांचे भाजीपाला फेकून आंदोलन 15 ते 20 कार्यकर्ते अटक

 

COMMENTS