दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांचा नामदेव शास्त्रींना इशारा !

दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांचा नामदेव शास्त्रींना इशारा !

राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज भगवानबाबांचे जन्मगाव सावरगाव इथे दसरा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांचा भाषणाचा रोख हा भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्यावर टीकेचा होता. जनतेच्या आग्रहामुळे मी जन्मभूमीत मेळावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझं काय चुकलं हे अजूनही कळत नाही. मी विनांती केली, पत्र लिहिलं, नमतं घेतलं घेतलं, वीस मिनिटं मागितली तरी सुद्धा मला मेळावा घेण्यास परवानगी नाकारली गेल. समाज महंतावर चिडला आहे, पण या राज्यात लेकीचं सरकार आहे. हजारो पोलिसांच्या तुम्हाला पहारा आहे. तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही मात्र तुम्ही सुद्धा भगवान बाबांच्या विचारांना धक्का लावू नका असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला .

भावनिक झालेल्या पंकजा यांनी यावेळी माझं काय चुकलं, मी मुंडेंची लेक आहे, मी कुणापुढं झुकणार नाही,  जनतेसाठी  मी कोणताही वार झेलायला तयार आहे, मी कोणाला घाबरत नाही, मात्र मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, माझी क्लिप व्हायरल केली गेली, या मागे कोण आहे हे सगळ्यांना माहीत आहे, मात्र हा मेळावा राजकीय नाही त्यामुळे त्याबाबत आज तरी काहीच बोलणार नाही असं म्हणत पंकजा यांनी महंत नामदेव शास्त्री यांच्या भूमिकेबाबत टीका केली .

लाखोंच्या संख्येने जमलेल्या जनतेसमोर पंकजा यांनी सावरगाव येथे भगवान बाबांचा भव्य पुतळा उभारून संस्कार केंद्र स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला, तसेच उपस्थित लोकांना स्त्री भ्रूण हत्या करणार नाही अशी शपथ दिली .महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो लोकांनी यावेळी पंकजा मुंडे,गोपीनाथ मुंडे यांच्या घोषणा दिल्या . या कार्यक्रमाला महादेव जानकर, राम शिंदे हे मंत्री आणि आमदार खासदर उपस्थित होते.

COMMENTS