स्मार्ट सिटीमध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश

स्मार्ट सिटीमध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश

केंद्र सरकारकडून जाहीर करण्‍यात आलेल्‍या स्‍मार्ट सिटीच्‍या यादीत महाराष्‍ट्रातील पिंपरी-चिंचवड या एकमेव शहराचा समावेश करण्‍यात आला आहे.

केंद्रीय मंत्री व्यंकया नायडू यांनी त्यांच्या ट्वीटर वरुन तिसऱ्या यादीत स्मार्ट सिटीमध्ये समावेश झालेल्या 30 नवीन शहरांची नावे जाहीर केली आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडच्या 18 व्या क्रमांकाला नाव जाहीर करण्यात आले आहे. या चौथ्या यादीत महाराष्ट्रातून केवळ पिंपरी-चिंचवड हे एकमेव शहर समाविष्ट केले गेले आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहराचा केंद्र सरकारकडे एकत्रीत प्रस्ताव गेल्याने शहराच्या गुणवत्ता यादीत 100 पैकी 98 गुण मिळवूनही पिंपरी-चिंचवडला स्मार्ट सिटी योजनेतून डावलले गेले होते. मात्र, आता स्‍मार्ट सिटीमध्‍ये पिंपरी-चिंचवडचा समावेश करण्‍यात आल्‍याने शहरवासियांमध्‍ये आनंद व्‍यक्‍त केला जात आहे.

 

COMMENTS