होळी साजरी करा ‘इको-फ्रेंडली’!

होळी साजरी करा ‘इको-फ्रेंडली’!

होळी आणि रंगपंचमी या सणांमुळे दिवसेंदिवस पर्यावरणीय प्रश्‍न गंभीर होऊ लागले आहेत. तापमान वाढ आणि दुष्काळाच्या पाश्वभुमीवर प्रतीकात्मक सण साजरे करून पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावण्याची गरज आहे.

 

होळी सण एरंडाच्या झाडाभोवती शेणी-लाकडे पेटवून पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. पूर्वी घरोघरी छोटी होळी करून सण साजरा केला जायचा, पण काळ बदल्याने याचे बाजारीकरण होऊ लागले आहे. होळीचा आकार मोठा होऊन गटा-तटामुळे मोठ-मोठ्या होळ्या केल्या जाऊ लागल्याने पर्यावरणाचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. होळीत जाळली जाणारी लाकडे, शेणी हा अजूनही एक मोठा इंधनाचा स्त्रोत मानला जातो. होळीत लाकडे व शेणी जाळल्याने हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषके सोडणे हे शास्त्रीय आणि पर्यावरणपूरक नाही. होळीत लाकडे व शेणी जाळल्याने कॉर्बन-डाय-ऑक्साईड नावाचा वायू बाहेर पडतो, हा वायू सध्या तापमान वाढीस कारणीभूत ठरत आहे. यावर्षी उन्हाळ्याची दाहकता लवकरच जाणवू लागली आहे. वाढत्या उष्णतेमध्ये होळ्या पेटवून अजूनच भर घालती जाणार आहे. 

 

गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण प्रेमी नागरिक, संघटना यांच्याकडून रासायनिक रंगांच्या दुष्पपरिणामांची जनजागृती केली जात आहे, नैसर्गिक रंग तयार करण्याची प्रात्यक्षिके आणि रंग उपलब्ध करून दिले जातात. महाराष्ट्र राज्यात मागील काही वर्ष दुष्काळ सदृश्य परिस्थिती पहाता व पाणीटंचाई लक्षात घेता ओले रंग खेळण्यास नागरिकांनी विशेषत: तरुणांनी फाटा दिला पाहिजे. कोरडे रंग खेळा, असे सांगितले जात आहे, पण ते देखील पर्यावरणपूरक नाही. कोरडे रंग खेळल्यानंतरही पाण्याचा वापर करावा लागणारच आहे. अंगावरून काढलेले हे रंग सांडपाण्यात मिसळून जलस्त्रोत प्रदूषित करतात. आधीच कमी झालेले जलसाठे प्रदूषित झाले तर याचा सर्वांना मोठा फटका बसणार आहे. पाण्याअभावी किंवा प्रदूषित पाणी पिल्याने जनावरे,पक्षी आणि जलचरांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. कोरड्या रंगामध्ये पारा, शिसे, क्रोमियम,अर्सेनिक आदी जड रसायने पाण्यामार्फत मानवी अन्नसाखळीत प्रवेश करतात. यामुळे मेंदू, मज्जासंस्था,गर्भातील बालकाची वाढ खुंटण्यासारखे आजाराचा धोका संभावतो. त्यामुळे घरगुती नैसर्गिक रंग लावून रंगपंचमी साजरी करण्याबरोबर पर्यावरण संवर्धनाला, पाणी बचतीला आणि समाजाचे आरोग्य जपण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.

 

होळी व रंगपंचमी साजरे करताना हे करा…

 

होळी : लाकडे व शेणी अत्यंत कमी वापरले जाईल, या पद्धतीने प्रतिकात्मक होळी साजरी करा, होळीसाठी वापरण्यात येणारी लाकडे व शेणी स्मशानभूमीस दिल्यास महापालिकेस मदत होईल, होळीसाठीचा प्रसाद होळीत थोड्या प्रमाणात टाकून तो इतरांना वाटल्यास अन्नाची नासाडी टळेल आणि इतरांना अन्नदान केल्याचे समाधान लाभेल. रंगपंचमी : प्रतिकात्मक नैसर्गिक रंगाचा नाम ओढून रंगपंचमी साजरी करावी, फक्त नैसर्गिकच रंग वापरावेत, अनैसर्गिक रंग पाण्यात जाऊन अन्नसाखळीस बाधा येणार नाही, याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी.

म्हणुन होळी व रंगपंचमी ” इको फ्रेंडली” साजरी केली पाहीजे.व त्यात नैसर्गिक रंग वापरावेत असे आवाहन मुंबईच्या डबेवालांनी मुंबईकरांना केले.फक्त आवाहनच केले नाही तर त्याने आज आपल्या हजारो ग्राहकांना जेवणाच्या डब्या बरोबर बिस्लरी कंपनीने दिलेली “नैसर्गीक रंग” असलेली रंगीची बाटली दिली.

अशा प्रकारे इको फ्रेंडली होळी आणी रंगपंचमी साजरी करावी असे आवाहन मुंबईचे डबेवाले व बिस्लरी कंपनी यांचे संयुक्त विद्यमाने मुंबईकरांना करण्यात आले.

COMMENTS