निवडणूक लढवण्याचे वय 18 वर्ष करा, यावर सुप्रीम कोर्ट काय म्हणाले ?

निवडणूक लढवण्याचे वय 18 वर्ष करा, यावर सुप्रीम कोर्ट काय म्हणाले ?

मुंबई – निवडणूक लढवण्याचे वय 18 वर्ष करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे करण्यात आली आहे. सध्या लोकसभा लढवण्यासाठी वयाची अट २५ वर्षं आहे. यावर सुनावणी करताना याबाबतीतला निर्णय घेण्याचा हक्क संसदेलाच आहे असं स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायायलयाने दिलं आहे. त्यामुळे संसदेत जर याबाबतचा ठराव मांडण्यात आला तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 18 वर्षांच्या तरुणांना देखील निवडणूक लढवता येणार आहे.

दरम्यान याबाबत लोकसभेतही काही दिवसांपूर्वी चर्चा झाली होती. परंतु त्यातून पुढे काहीच निष्पन्न झालं नाही. प्रवीण कुमार यांनी ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती . ‘ उमेदवारांचे वय कमी करण्यात यावे असे मत निवडणूक आयोगाचे प्रमुख ओ.पी.रावत यांनीही व्यक्त केले आहे. जर मतदाराचे वय १८ असू शकते तर उमेदवारांचे का नाही? तरुणांना निवडणूक लढवण्याची संधी कधी देणार’ अशी भूमिका प्रवीण कुमार यांच्यावतीने राहूल मौर्य यांनी मांडली आहे.

तसेच १९८९ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने मतदारांसाठी वय २१वरून १८ वर्षं केले होते. आजचा युवक सुजाण असून त्याचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग गरजेचा आहे असं मत तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी व्यक्त केलं होतं. त्यानंतर मतदाराप्रमाणेच खासदाराची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादाही कमी करण्याची मागणी आता केली जात आहे.

COMMENTS