30 जून 2016 नंतरच्या थकबाकीदारांनाही कर्जमाफी द्या – धनंजय मुंडे

30 जून 2016 नंतरच्या थकबाकीदारांनाही कर्जमाफी द्या – धनंजय मुंडे

मुंबई – 30 जून 2016 नंतर पीक कर्ज घेतलेल्या अनेक शेतक-यांची कर्जे कृषीमालाचे त्या बाजारभाव पडल्यामुळे उत्पादन खर्च देखील निघालेला नाही. त्यामुळे असे शेतकरीही थकीत झालेले आहेत. सरकारने जाहीर केलेल्या सरसकट कर्जमाफीच्या योजनेत अशा शेतक-यांचा समावेश आहे किंवा कसे याबाबत कोणतीही स्पष्टता अद्याप येऊ शकलेली नाही म्हणून राज्यातील अशा शेतक-यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी दिसून येत आहे. वास्तविकता ज्या कारणामुळे शेतक-यांचे थकीत कर्ज माफ करण्याचे धोरण शासनाने स्वीकारले आहे त्याच कारणांनी या शेतक-यांची कर्जे थकीत असल्याने 30 जून 2016 पूर्वीची थकीत कर्जे व 30 जून 3016 नंतरची थकीत कर्जे असा भेदभाव करणे योग्य नसल्याने या शेतक-यांची कर्जे देखील माफ करावीत व त्यांना दिलासा द्यावा अशी मागणीही विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

COMMENTS