राणेंचा आज भाजप प्रवेश, राणेंकडूनही भाजप प्रवेशाला दुजोरा

राणेंचा आज भाजप प्रवेश, राणेंकडूनही भाजप प्रवेशाला दुजोरा

ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे पुत्र माजी आमदार विश्वजीत राणे हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गोवा भाजपच्या वतीने ही माहिती देण्यात आलीय. राणे हे कुठल्याही अटीशिवाय भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती भाजपचे गोव्याचे प्रदेशाध्यक्ष विजय तेंडुलकर यांनी दिलीय. राणेंचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करणार का, असा प्रश्न तेंडुलकर यांना विचारला असता त्यांनी याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे सांगितले. विश्वजीत राणे यांनीही भाजप प्रवेशाच्या बातमीला दुजोरा दिलाय.

 

वालपोई मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या विश्वजीत राणे यांनी १६ मार्च रोजी काँग्रेस आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. 40 सदस्य संख्या असलेल्या गोवा विधानसभेत 17 जागा जिंकूनही काँग्रेसला सरकार बनवता आले नव्हते. त्यामुळे नाराज राणे यांनी गेल्या महिन्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती.

 

 

COMMENTS