400 कोटींचा डाळ घोटाळा होईपर्यंत पारदर्शक सरकार झोपले होते काय ?

400 कोटींचा डाळ घोटाळा होईपर्यंत पारदर्शक सरकार झोपले होते काय ?

मुंबई – राज्यात 400 कोटींचा तूर डाळ घोटाळा झाल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. यामुळे तूरडाळीवरून शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. 400 कोटींचा घोटाळा होईपर्यंत पारदर्शक सरकार झोपले होते काय? असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.

तूरडाळ घोटाळ्याचे खापर कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीवरही या सरकारला फोडता येत नसल्याचा टोला सामनातून लगावला आहे. तुरडाळीचे उत्पादन जास्त झाले, त्यामुळे भाव कोसळले. हे सरकारकडून नेहमीचेच उत्तर मिळत आहे. सरकार बदलले पण शेतक-यांबाबतचे धोरण आणि नियोजन साफ फसले आहे. शेतक-यांनी पिकवलेली तूरडाळ दलाल आणि व्यापाऱयांनी कवडीमाल भावाने खरेदी केली आणि तीच डाळ हे व्यापारी सरकारी केंद्रावर चढय़ा किमतीत विकत आहेत. सरकार बदलले तरी शेतकऱ्यांबाबतचे धोरण आणि नियोजन साफ फसले आहे. हा डाळ घोटाळा कोटींचा असल्याचा आरोप करत तूरडाळीचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांवर माती खायची वेळ आली असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS