भाजपविरोधात 600 कलाकारांचं पत्र, भाजपला मतदान न करण्याचं आवाहन!

भाजपविरोधात 600 कलाकारांचं पत्र, भाजपला मतदान न करण्याचं आवाहन!

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का बसला असून अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यासह विविध 600 पेक्षा जास्त कलाकारांनी भाजपला मत न देण्याचं आवाहन केलं आहे. या सर्व कलाकारांनी एक पत्र लिहिलं असुन  मतदानाच्या माध्यमातून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाला सत्तेपासून दूर ठेवा. असं आवाहन त्यांनी केलं आहे.

याअभिनेत्यांमध्ये अमोल पालेकर, नसीरुद्दीन शाह, गिरीश कर्नाड, एमके रैना आणि उषा गांगुली यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. त्यामुळे भाजपला धक्का बसला असल्याचं दिसत आहे.पत्र 12 भाषांमध्ये तयार करुन आर्टिस्ट युनायटेड इंडिया वेबसाईटवर टाकण्यात आलं आहे.

दरम्यान भारत आणि संविधान धोक्यात आलं असल्याचं या कलाकारांचं म्हणणं आहे. आगामी लोकसभा निवडणूक ही देशातील सर्वात गंभीर निवडणूक आहे. आज गीत, नृत्य, हास्य धोक्यात आहे. आपलं संविधान धोक्यात आहे. जिथे तर्क, वितर्क आणि चर्चा होतात अशा संस्थांचा सरकारने गळा दाबलाय. एखाद्या लोकशाहीला सर्वात कमकुवत आणि सर्वात वंचित लोकच बळकट बनवू शकतात. कोणतीच लोकशाही प्रश्नाविना, चर्चेविना आणि मजबूत विरोधकांशिवाय चालू शकत नाही. या सर्वच गोष्टी सध्याच्या सरकारने पायदळी तुडवल्या असल्याचा आरोप या कलाकारांनी केला आहे.

COMMENTS