“62 %  महिला कंडक्टरचे होतात गर्भपात”

“62 % महिला कंडक्टरचे होतात गर्भपात”

राज्य परिवहन महामंडळात वाहक म्हणून काम करणाऱ्या 210 महिला कर्मचाऱ्यांचा ( सुमारे 62%) गर्भपात झाला असल्याची धक्कादायक बाब एका अहवालात समोर आली आहे. गर्भधारण झालेल्या महिला वाहकांना सततचा प्रवास, प्रवासा दरम्यान होणारी असुविधा, प्रवाशांची धक्काबुक्की अशा अनेक कारणांमुळे गर्भपाताला सामोरे जावे लागत आहे.

गरोदरपणाच्या काळात त्यांना डेस्क वर्क द्यावे अशी सातत्याने मागणी होऊनही त्याबाबत परिवहन खाते असंवेदनशील असल्याची तक्रार वाहक महिलांनी केली आहे. सरकारी महिला कर्मचारी सुविधांपासून वंचित आहेत.

या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध व्यक्त केला असून महिलांच्या आरोग्याविषयक ठोस पावले उचलण्याची सरकारकडे मागणी करण्यात येणार आहे.

 

 

COMMENTS