मी उदयनराजेंचा फॅन आहे म्हणत आदित्य ठाकरेंनी केला वाकून नमस्कार !

मी उदयनराजेंचा फॅन आहे म्हणत आदित्य ठाकरेंनी केला वाकून नमस्कार !

सातारा – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी
मी उदयनराजेंचा फॅन आहे म्हणत त्यांना वाकून नमस्कार केला. आज साताऱ्यातील पाटणमध्ये जाहीर आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. पाटण विधानसभेचे शिवसेना उमेदवार शंभूराज देसाई यांच्या प्रचारार्थ ही सभा झाली. यावेळी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार आणि माजी खासदार उदयनराजे भोसलेही मंचावर उपस्थित होते. यावेळी उदयनराजे मंचावर आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांना वाकून नमस्कार केला.मी उदयनराजेंचा फॅन आहे. त्यांना भेटायला आलो आहे. माझे भाग्य आहे की मी त्यांच्या शेजारी बसलो आहे. असं आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान आदित्य ठाकरे वाकून नमस्कार करत असताना त्याचवेळी उदयनराजेंनी पाया त्यांना उठवत, अलिंगन दिलं. यावेळी उदयनराजे यांनी आपल्या भाषणात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. सुरुवातीला
भाजप-शिवसेनेचा एकही खासदार तर सोडा आमदार या पश्चिम महाराष्ट्रात नव्हता. सर्व आमदार, खासदार काँग्रेसचे आणि नंतर राष्ट्रवादीचे झाले. मात्र, ही जबाबदारी त्यांची होती ज्यांनी तुमच्या शेतात साधं पाणी सुद्धा दिलं नाही असंही यावेळी उदयनराजे म्हणाले.

COMMENTS