युती आणि आघाडीतील ‘या’ बंडखोर उमेदवारांचा अर्ज मागे!

युती आणि आघाडीतील ‘या’ बंडखोर उमेदवारांचा अर्ज मागे!

भिवंडी – भिवंडीतील युतीचे बंडखोर उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तर आघाडीचे बंडखोर उमेदवार विश्वनाथ पाटील यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. परंतु त्यांनी भाजपला पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. या दोन्ही नेत्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता भिवंडीत युती विरोधात आघाडी अशीच लढत होणार आहे.

दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सुरेश म्हात्रे यांनी आपली प्रतिक्रिया दिली दिली आहे. युतीच्या विरोधात आम्ही कधीच नाही,परंतु कपिल पाटील यांच्या विरोधातच काम करणार असल्याची भूमिका म्हात्रे यांनी घेतली आहे. तसेच युतीतील नेते नाराज होऊ नये म्हणून माघार घेतली असल्याचही म्हात्रे यांनी म्हटलं आहे.

तसेच विश्वनाथ पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली असून मुख्यमंत्र्यांनी काही अश्वासन दिल आहे. तसेच त्यांच्यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे मी उमेदवारी अर्ज मागे घेतला व भाजप उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला असल्याचं विश्वनाथ पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS