केजरीवालांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली !

केजरीवालांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली !

बुलढाणा – सिंदखेड राजा येथे होणा-या आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त १२ जानेवारीरोजी ही सभा घेण्यात येणार होती. परंतु पोलिसांनी ही परवानगी नाकारली असली तरी आम आदमी पार्टीनं आक्रमक भूमिका घेतली असून येत्या १२ तारखेला केजरीवालांची सभा होणार असल्याचा पवित्रा घेतला आहे.

या सभेसाठी सुरुवातीला प्रशासनानं परवानगी दिली होती परंतु आता अचानक ही परवानगी नाकारली असल्याचं आम आदमी पार्टीनं म्हटलं आहे.तसेच राजनीतिक दबावाखाली पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांच्या सभेची परवानगी रद्द केली असल्याचा आरोपही पक्षानं केला आहे. परंतु परवानगी मिळाली किंवा नाही मिळाली तरी आम्ही सभा घेणार असल्याचा पवित्रा आम आदमी पार्टीनं घेतला आहे.

 

COMMENTS