रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा विचार होता, परंतु… –रामदास आठवले

रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा विचार होता, परंतु… –रामदास आठवले

नागपूर – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत आपली भूमिका व्यक्त केली आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा पूर्वी विचार होता, परंतु आता लोकसभा निवडणूक दक्षिण मध्य मुंबईतून लढणार असल्याचं आठवलेंनी जाहीर केलं आहे. तसेच सेना – भाजप युती झाली तर बरे, नाही झाले तरी मी तिथूनच निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं आठवलेंनी म्हटलं आहे.

दरम्यान राज्यात लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला 2 जागा मिळाव्या यासाठी आम्ही आग्रही असल्याचंही यावेळी आठवले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात सेना-भाजपची युती झाली किंवा नाही झाली तरी दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणुकीसाठी आठवले उत्सुक आहेत. तसेच भाजपचे मित्रपक्ष असलेल्या आठवलेंच्या आरपीआयला भाजप लोकसभेसाठी दोन जागा सोडणार का हे पाहणं गरजेचं आहे.

 

 

COMMENTS