या सरकारचा अध्यक्षही बहिरा, हरिभाऊ बागडेंवर अब्दुल सत्तार यांची टीका !

या सरकारचा अध्यक्षही बहिरा, हरिभाऊ बागडेंवर अब्दुल सत्तार यांची टीका !

औरंगाबाद – हे सरकारच नाही तर या सरकारचा अध्यक्षही बहिरा असल्याची टीका माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. या सरकारचा अध्यक्ष बहिरा आहे, मी या अध्यक्षांना शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उंची कमी का झाली हा प्रश्न विचारला तर मला ते म्हटले बसा खाली. यांना काही ऐकूच येत नाही. मग तो शिवस्मारकाबद्दलचा प्रश्न असो किंवा जनतेचे प्रश्न असो असं सत्तार यांनी म्हटलं आहे. चे औरंगाबादच्या पैठण तालुक्यात झालेल्या सभेत बोलत होते.

दरम्यान हरिभाऊ बागडे यांना कमी ऐकू येतं हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. परंतु त्यांच्या व्यंगावर बोट ठेवत अब्दुल सत्तार यांनी टीका केली. निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षातील नेते एकमेकांवर टीका करत आहेत. सत्तार यांनीही याच पार्श्वभूमीवर हरिभाऊ बागडे यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS