माझा कंट्रोल ‘मातोश्री’वर, राजीनाम्याबाबत अब्दूल सत्तारांची प्रतिक्रिया!

माझा कंट्रोल ‘मातोश्री’वर, राजीनाम्याबाबत अब्दूल सत्तारांची प्रतिक्रिया!

औरंगाबाद – शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा होती. परंतु हे वृत्त सत्तार यांनी फेटाळलं आहे. मी पत्रकारांच्या एकेक प्रश्नाचे उत्तर देईन. मी मुख्यमंत्र्यांशी सर्व चर्चा करेन त्यानंतर यावर उत्तर देईन. पण मी आज तुम्हाला उत्तर देणार नाही. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन त्यावर उत्तर देईन. ज्यांनी राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या त्यांना जाऊन विचारा. माझा कंट्रोल ‘मातोश्री’वर आहे. मी आज मुंबईला जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणार आहे. मी राजीनामा दिला की नाही हे ज्यांनी माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या त्यांना विचारा असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

दरम्यान मी राजीनामा दिला हे ज्यांनी कुणी तुम्हाला सांगितले त्यांना जाऊन विचारा. कुणी काही बोलेल, माझा सर्व कंट्रोल हा मातोश्रीवर आहे. मी तिथे जाऊन सर्व विषयावर चर्चा करणार आहे. चर्चा करुन तुमच्याशी बोलेन. मला मानण्याचा प्रश्न नाही. मी सर्व प्रश्नांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करेन आणि तुम्हाला उत्तर देईन. आज माझी एकच विनंती आहे की कोणीही माझ्याबद्दल काय बोललं, काय नाही बोललं याची पूर्ण तंतोतंत माहिती उद्धव ठाकरेंकडे दिली जाईल. माझी काय भूमिका आहे हे मी त्यांच्यासमोर मांडेन. त्यानंतर तो जो निर्णय घेतील हा सर्वांना मान्य राहिल किंवा नाही हे मला सांगता येणार नाही. पण मला आज कोणत्याही या प्रश्नावर उत्तर द्यायचे नसल्याचंही सत्तार म्हणाले आहेत.

COMMENTS