भाजपच्या महाराष्ट्र निवडणूक प्रभारी, सहप्रभारी पदावर यांची नियुक्ती!

भाजपच्या महाराष्ट्र निवडणूक प्रभारी, सहप्रभारी पदावर यांची नियुक्ती!

मुंबई – राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या महाराष्ट्र निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारी पदाची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपने महाराष्ट्र निवडणूक प्रभारी म्हणून भूपेंद्र यादव यांची नियुक्ती केली आहे तर सहप्रभारीपदावर केशव प्रसाद मौर्य यांना नियुक्त केले आहे. मूळ राजस्थान येथील भूपेंद्र यादव यापूर्वी गुजरातचे प्रभारी राहिले आहेत. त्यानंतर आता त्यांच्यावर भाजपच्या महाराष्ट्र निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दरम्यान महाराष्ट्रासह नवी दिल्ली, हरियाणा, झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभारी पदाची नियुक्ती करण्यात आली आहे.

दिल्ली विधानसभा

निवडणूक प्रभारी- प्रकाश जावेडकर

सह चुनाव प्रभारी- हरदीप सिंह पुरी आणि नित्यानंद राय

प्रदेश संघटण प्रभारी- श्याम जाजू

राष्ट्रीय सचिव- तरुण चुघ

हरियाणा विधानसभा निवडणूक

निवडणूक प्रभारी- नरेंद्र सिंह तोमर

सह प्रभारी- भूपेंद्र सिंह

झारखंड विधानसभा निवडणूक

निवडणूक प्रभारी- ओम प्रकाश माथुर

सह प्रभारी- नंद किशोर यादव

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

निवडणूक प्रभारी- भूपेंद्र यादव

सह प्रभारी – केशव प्रसाद मौर्य आणि लक्ष्मण सावदी

COMMENTS