लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळणार?, राज्यात सर्वात सक्षम नेता कोण ?, एबीपीचा ओपीनियन पोल !

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळणार?, राज्यात सर्वात सक्षम नेता कोण ?, एबीपीचा ओपीनियन पोल !

मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळणार याबाबतचं सर्वेक्षण एबीपी या वृत्तवाहिनीनं केलं होतं. या सर्वेक्षणातून देशभरातील मतदारांचा कौल हाती आला असून एनडीएला 300 तर युपीएला 116 आणि इतर पक्षांना 127 जागा मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच राज्यात भाजपची शिवसेनेसोबत युती झाली तर एनडीएला 34 आणि युपीएला 14 जागा मिळतील असा अंदाज या सर्वेतून मांडण्यात आला आहे.

तसेच राज्यात सर्वच पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली तर भाजप आणि मित्रपक्षांना 37.8 टक्के मतांसह 23 जागा, काँग्रेस आणि मित्रपक्षांना 28.5 टक्के मतांसह 14 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 13.5 टक्के मतांसह 6 जागा तर शिवसेनेला 8.5 टक्के मतांसह 5 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. तर इतर पक्षांना 11.7 टक्के मतं मिळतील परंतु एकही जागा मिळणार नसल्याची शक्यता आहे.

तसेच राज्यातील सर्वात सक्षम नेता म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 19.3 टक्के तर शरद पवार यांना 18.7 टक्के, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना 11.8 टक्के मतदारांनी पसंत दर्शवली आहे. तसेच नितीन गडकरी यांना 11 टक्के, राज ठाकरे यांना 9 टक्के, अशोक चव्हाण यांना 7.5 टक्के, अजित पवार यांना 5.1 टक्के, पृथ्वीराज चव्हाण यांना 3.9 टक्के आणि सुप्रिया सुळे यांना 2.2 टक्के मतदार सक्षम नेता मानतात. त्यामुळे या सर्वेक्षणातून मुख्यमंत्री फडणवीस यांना सर्वात सक्षम नेता असल्याचं समोर आलं आहे.

COMMENTS