एबीपी न्यूजमध्ये मोठी उलथापालथ,  सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून तीव्र संताप !

एबीपी न्यूजमध्ये मोठी उलथापालथ,  सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून तीव्र संताप !

दिल्ली – एबीपी न्यूजचे व्यवस्थापकीय संपादक मिलींद खांडेकर यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्याचसोबत एबीपी न्यूजच्या मास्टरस्ट्रोक या कार्यक्रमाचे अँकर पुण्याप्रसून वाजपेयी यांनीही तडकाफडकी राजीनामा दिला आहे. तर अभिसार शर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे माध्यमांसोबतच समाजमाध्यमांमध्ये याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. राजकीय वर्तुळातूनही याबाबत प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याबाबत ट्विट करत याबाबत मोदी सरकावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून एबीपी न्यूजवर सरकारविरोधात जोरदार मोहीम उघडली होती. त्यामुळे ही कारवाई झाल्याचं बोलंलं जातंय. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमात एक छत्तिसगडमधील महिला तिचं उत्पन्न दुप्पट झाल्याचं सांगत होती. एबीपी न्यूजच्या रिपोर्टरने त्या गावात जाऊन रिपोर्ट केला होता. त्यानुसार त्या महिलेचे उत्पन्न तर वाढले नाहीच उलट तिला काय आणि कसं बोलायचं यासाठी दिल्लीतून अधिकारी आले होते असं त्या महिलेनं सांगितलं. ती बातमी एबीबी न्यूजच्या मास्टरस्ट्रोक या कार्यक्रमात दाखवली होती. त्यावरुन सरकारमध्ये मोठी नाराजी पसरली होती. पुण्यप्रसून वाजपेयी हे या शोचे अँकरीग करत होते. त्यामुळे ही कारवाई झाल्याचं बोलंलं जातंय. त्यांना राजीनामा देण्यास सांगितल्याची चर्चा आहे. त्यांनीही ट्विट करत असाच काहीतरी प्रकार झाल्याचं ट्विटद्यारे अप्रत्यक्षपणे सांगितलं आहे.

गेले काही दिवस मास्टरस्ट्रोक हा कार्यक्रम सुरू झाल्यावर तो व्यवस्थित दिसत नव्हता. त्यावर ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनीही यावर ट्विट केलं आहे.

निवडणुकीची तयारी सुरू झाल्याचं ट्विट योगेंद्र यादव यांनी केलं आहे.

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनीही याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

याशिवाय अनेक राजकीय नेते आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंतांनी यावर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.

COMMENTS