कमल हसन आज नवा पक्ष स्थापन करणार, अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार !

कमल हसन आज नवा पक्ष स्थापन करणार, अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार !

मदुराई – सुपरस्टार रजनिकांत यांनी राजकारणात एन्ट्री मारल्यानंतर आता अभिनेता दिग्दर्शक कमल हसन आपल्या राजकीय पक्षाची स्थापना करणार आहेत. यासाठी कमल हसन यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खास आमंत्रण दिलं आहे.  त्यासाठी आज अरविदं केजरीवाल मदुराईमध्ये जाणार आहेत. कमल हसनच्या पक्षाची घोषणा आणि अरविंद केजरीवाल त्याठिकाणी येणार असल्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान आज संध्याकाळी ६ वाजता हा कार्यक्रम पार पडणार असून पक्षाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून कमल हसन आणि अरविंद केजरीवालही भाषण करणार आहेत. आपल्या पक्षाचा उद्देश आणि मुद्दे काय असतील हे यावेळी कमल हसन स्पष्ट करणार आहेत. तसचं  पक्षाच्या झेंड्यांचही अनावरण होणार असल्याची माहिती आहे. तत्पूर्वी आज कमल हसन यांनी रामेश्वरमध्ये जाऊन माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या घरी जाऊन कलाम यांना श्रद्धांजली वाहिली. कलाम यांच्या कुटुंबियाशी बातचीत केली असल्याची माहिती आहे.

 

COMMENTS